Your Own Digital Platform

रामराजेंच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश व चष्मे वाटप
फलटण : फलटण नगर परिषद शिक्षण मंडळाच्या शाळांमधील विध्यार्थ्याना शालेय गणवेश आणि चष्मे वाटप गुरुवार दि. २ रोजी दुपारी ४ वाजता नगर परिषद कार्यालय इमारतीमधील सभागृहात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात येणार असून आ. दिपक चव्हाण समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.

या समारंभास विशेष अतिथी म्हणून आ. राहुल नार्वेकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, उपळेकर देवस्थान ट्रस्टच्या सेक्रेटरी श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्या श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती सदस्य श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर उपस्थित राहणार आहेत.

नगर परिषद शिक्षण व सांस्कृतीक कार्य समिती यांच्या निधीतून गणवेश आणि महिला व बालकल्याण समिती निधीतून चष्मे उपलब्ध करुन देण्यात आल्याचे या समित्यांच्या सभापती अनुक्रमे सौ. प्रगतीताई कापसे आणि सौ. जोत्स्नाताई शिरतोडे यांनी सांगितले असून या कार्यक्रमास फलटणकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सौ. प्रगतीताई कापसे आणि सौ. जोत्स्नाताई शिरतोडे यांनी केले आहे.