आ. मकरंद पाटील यांचा धरणे आंदोलनाला पाठींबा


लोणंद : वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघाचे आ. मकरंद पाटील यांनी सोमवारी खंडाळा तहसीलदार 
कार्यालयासमोर धनगर समाजाला एसटी आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी खंडाळा तालुक्‍यातील समस्त धनगर समाजाच्यावतीने 3 ऑगस्टपासून पुकारलेल्या धरणे आंदोलनाला भेट देऊन जाहीर पाठींबा दिला.

यावेळी 30 जुलै 2018 रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस विधिमंडळ सभागृह नेते आ. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी राज्यपाल विद्यासागर राव यांना दिलेल्या निवेदनाची प्रत खंडाळा तालुका धनगर आरक्षण कृती समितीला देण्यात आली. धनगर समाजाला आरक्षण मिळण्याची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची आग्रही भूमिका असल्याची माहिती आ. मकरंद पाटील यांनी यावेळी दिली.

यावेळी खंडाळा तहसीलदार विवेक जाधव, स.पो.नि. हणमंत गायकवाड तसेच धनगर आरक्षण कृती समितीचे रमेश धायगुडे, शिवाजीराव शेळके, लक्ष्मणराव शेळके, अशोक धायगुडे, अजयराव धायगुडे, हणमंत शेळके, दत्तानाना धायगुडे, विठ्ठल शेळके, सागर शेळके, गणेश धायगुडे, ऋषिकेश धायगुडे, तात्या शेंडगे, भगवान ठोंबरे, ओंकार शेळके आदी समिती सदस्य आणि खंडाळा तालुक्‍यातील पदाधिकारी राजेंद्र तांबे, ऍड. सुभाषराव घाडगे, अजय भोसले, डॉ. नितीन सावंत, गजेंद्र मुसळे, रवींद्र क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.