पालिकेच्या इंदूर दौऱ्याला राजकीय हेलकावे
सातारा :स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशात प्रथम आलेल्या इंदूर या शहरास भेट देण्याचा सातारा पालिकेचा स्त्युत्य उपक्रम परवानगीचे राजकीय हेलकावे घेतो आहे. कराडची इंदूर स्वारी यशस्वी झालेली असताना शाहूनगरीचा दौरा अजूनही कागदोपत्री रांगत असल्याचा अनुभव आहे. इंदूरमधील पाहून आलेल्या अनेक गोष्टी आपल्याकडे नाहीत त्या परिपूर्ण करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न व्हावा हीच एक अपेक्षा या दृष्टीने साताऱ्यातही सामुहिक प्रयत्न घडावेत ही अपेक्षा आहे.
मात्र राजकीय वरदहस्ताचा प्रचंड बागुलबुवा येथील नेतृत्वानी उभां करून ठेवला आहे. सातारा ते इंदुर या लांब पल्ल्याच्या प्रवासात कोणालाही कसलाही ञास होणार नाही कंटाळा येणार नाही याची सर्वंकश काळजी घेण्याची जवाबदारी मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी घेतली पण विभागीय आयुक्तांकडून आलेल्या चौकशीच्या लेटर बॉम्बने दौऱ्याचा राजकीय घोटाळा झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
पुरुष सदस्यांवरची आवश्यक ती बंधने, चर्चेचा व संवादाचा उत्तम दर्जा, दिलखुलास करमणूक, चहा पाण्यापासुन ब्रेकफास्ट, भोजन व निवास व्यवस्था दर्जेदार यामुळे कराड पालिकेचा दौरा अतिशय यशस्वी झाल्याची बातमी साताऱ्यात येऊन पोहोचली आणि बुधवारी दुपारी स्थायी समितीचा अजेंडा चाळण्यास सुरवात झाली. मात्र जायचं जायचं इतकच काहीस सांगण्यात आल्याने वर्धापनदिनामुळे उजळलेले चेहरे खट्टू झाले.
जाता-जाता मोरगावचा मोरेश्वर शिर्डीचे साईबाबा, महेश्वर, ओंकारेश्वर, उज्जैनचा महाकालेश्वर, रांजणगावचा सिध्दिविनायक, महाराष्र्टाचा अभिमान असलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची समाधी दर्शनाचा जय्यत घाट कराडचे मुख्याधिकारी यशवत डांगे यांनी घातला आणि तो पूर्ण केला मात्र साताऱ्यात आरंभशूर मंडळी गणपती उत्सवाचा मुहूर्त शोधण्यात गुंग राहिली.
स्वच्छ सर्वेक्षणात देशात प्रथम आलेल्या इंदुर शहराच्या पहाणीत घराघरातुन केले जाणारे कचरा व्यवस्थापन, वर्गिकरण व वापर, सिवेज ट्रिटमेंट प्लांट, खत निर्मिती प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प या सर्व उत्तम प्रतिच्या व नियोजनबध्द यंञणांच्या पहाणीतून ज्ञानात नक्किच भर पडली. शहरातील सर्व रस्त्यांना लागून पादचारी मार्ग व त्याला लागून सर्व्हिस रोडवरील विविध वृक्षांचे संवर्धन व जतन तसेच शहरातील चौकाचौकांचे केलेले सुशोभिकरण विविध प्रकल्पांनी इंदूरने देशपातळीवर झेंडा रोवला.
सार्वजनिक वापरासाठी ठिकठिकाणी उभारलेल्या शौचालयामुळे सार्वजनिक आरोग्य व स्वच्छतेचे भान ठेवलेले दिसले. पालिकेच्या उत्तम व लीन व्यवस्थापनामुळे नागरिकांचाही स्वच्छ सर्वेक्षणात उस्फुर्त सहभाग घेतल्याने लोकाभिमुख विकासाचे उदाहरण तयार झाले. त्याच इंदूर पॅटर्नची अ वर्ग सातारा पालिकेला गरज आहे. राजकीय एकवाक्यता आणि इच्छाशकती कराड पालिकेने दाखवत रवच्छता अभियानासाठी आपण सिद्ध असल्याचे सांगितले. पण साताऱ्यात फुकाचा गाजावाजा झाल्याची राजकीय खसखस पिकू लागली आहे.
Post a Comment