जातवैधता प्रमाणपत्र : कराडात सर्व नगरसेवक ‘सेफ’


कराड : कराड नगरपालिका व मलकापूर नगरपंचायत निवडणुकीत आरक्षित जागेवर विजयी झालेल्या सर्व 20 नगरसेवकांनी आपले जातवैधता प्रमाणपत्र वेळेत सादर केल्याची माहिती कराड व मलकापूरच्या मुख्याधिकार्‍यांनी दिली आहे. त्यामुळेच कराड तालुक्यातील सर्व नगरसेवक ‘सेफ’ राहिले आहेत.

कराड नगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या 29 इतकी आहे. यापैकी अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग या राखीव जागांवर नगराध्यक्षांसह 12 नगरसेवक विजयी झाले आहेत. तर एक नगरसेविका सर्वसाधारण महिलेसाठी राखीव जागेवरून विजयी झाली आहे. त्यामुळेच नगराध्यक्षांसह 12 नगरसेवक, नगरसेविकांना जात वैधता प्रमाणपत्र नगरपालिका निवडणुकीनंतर तीन महिन्यांनी म्हणजेच फेब्रुवारी 2017 पर्यंत सादर करणे आवश्यक होते. त्यानुसार सर्व नगरसेवकांनी ते प्रमाणपत्र वेळेत सादर केल्याचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी सांगितले आहे.

तर मलकापूर नगरपंचायतीची नगरसेवक संख्या 17 इतकी असून अनुसूचित जाती व नागरिकांचा मागास प्रवर्गातून 8 नगरसेवक, नगरसेविका विजयी झाल्या आहेत. कराडप्रमाणेच 2013 साली निवडणुकीनंतर या सर्व नगरसेवकांनी वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्याचे मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी सांगितले आहे.

No comments

Powered by Blogger.