सलोनी खाडे शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता यादीत
पळशी : पळशी (ता. माण) येथील श्री हनुमान विद्यालयातील इयत्ता 8 वी, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 6 विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. यामध्ये सलोनी राजेंद्र खाडे 264 गुण मिळवून ग्रामीण गुणवत्ता यादीत राज्यात 10 वा क्रमांक मिळवला. तसेच धनश्री ब्रह्मदेव खाडे हिने 218 गुण, शुभांगी सतीश खाडे हिने 210 गुण, नेहा नानासाहेब टकले हिने 194 गुण, अनिषा दत्तात्रय खाडे हिने 186, ऋषीकेश नानासाहेब वणवे याने 180 गुण मिळवून यश संपादन केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या यशासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका रेहाना नायकवडी, शिष्यवृत्ती विभागप्रमुख आश्विनी खाडे व अनिल राऊत, बापू काळे, पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक, स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती, आयडियल ग्रुप तसेच सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

No comments

Powered by Blogger.