Your Own Digital Platform

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक पूण्यतिथी म्हसवडमध्ये मोठ्या उत्साहात साजरी


म्हसवड  :  लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक पूण्यतिथी म्हसवड व परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी येथिल आण्णाभाऊ साठे युवक मंडळाच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची शहरातुन सवाद्य मिरवणुक काढण्यात आली तर लो. टिळक व लोकशाही आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे म्हसवड नगरपरिषदेच्या दालनात पुजन करण्यात आले.

येथील आण्णाभाऊ साठे मंडळाच्या उत्सव समितीच्या माध्यमातून मल्हार नगर येथे माजी नगराध्यक्षा वैशाली लोखंडे प्रतिभा लोखंडे यांच्या हस्ते आण्णाभाऊच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले यावेळी माजी उपनगराध्यक्ष व सभापती शहाजी लोंखंडे माजी नगरसेवक शिवाजी लोखंडे भिमराव लोखंडे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सदाशिव लोखंडे खजिनदार शहाजी लोखंडे आर पी आयचे महेश लोखंडे धर्मराज लोखंडे आदी समाज बांधवानी आण्णाभाऊना अभिवादन केले यावेळी प्रियांका लोखंडे व आश्लेषा लोखंडे या दोघीनी आण्णाभाऊच्या विचाराची कास धरुन आजच्या युवकानी वाटचाल करुण आण्णाभाऊना प्रेरित असलेला समाज निर्माण करण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले.

सांयकाळी मुख्य पेठेतुन भव्या मिरवणूक काढण्यात आली यावेळी मुख्य पेठेत विविध मान्यवरांनी प्रतिमेला पुष्पहार आर्पण करण्यात आले मिरवणुकीत लेझीम हलगी हे पारंपारिक वाद्यांच्या सुरात उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.

दरम्यान येथील सिध्दनाथ हायस्कूल व ज्युनिअर काँलेज लोकमान्य टिळक व आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन मा.प्राचार्य आरुण काकडे उपमुखाध्यापक अशोक शिंदे पर्यवेक्षक जालिंदर पवार प्रा. दत्तात्रय माने प्रा चंद्रकांत चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले यावेळी विद्यार्थी विद्यार्थीनीची भाषने घेण्यात येवून या महान नेत्याच्या कार्याची माहिती देण्यात आली यावेळी राजेंद्र अवघडे मिलिंद शिंदे पवार यांनी आण्णाभाऊ व टिळक यांच्या कार्याची माहिती दिली.