आषाढाच्या शेवटच्या टप्यात “आखाडी’ला जोर


नागठाणे : श्रावण सुरु होण्यापूर्वी म्हणजे आषाढात आखाडी कोंबडे बळी देण्याची प्रथा ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातही सुरू आहे. यासाठी आखाडीच्या पंगती रंगू लागल्या असून, पावसाच्या उघडिपीत आखाड्या जोरात सुरू आहेत. सध्या आषाढ महिन्याचा शेवटचा आठवडा सुरु असल्याने बाजारपेठेत काळ्या अन्‌ उलट्या पिसांच्या कोंबड्यांचा भाव चांगलाच वधारला आहे. नागरिकांचीही कोंबडे खरेदीसाठी चढाओढ सुरू असल्याचे चित्र आहे. एरव्ही दोन-तीनशे रुपयांना मिळणाऱ्या सर्वसाधारण कोंबडे चक्क 700 ते 800 रुपये मोजावे लागत आहेत.

यंदा पाऊस चांगला पडला असून जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पेरण्या उरकलेल्या आहेत. शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे आषाढातील “देणगती’ बेंदुर सणापासून जोमाने सुरू झाल्या आहेत. हिंदु धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व असल्याने या महिन्यात धार्मिक कार्यक्रमांवर ग्रामीण भागासह शहरातील नागरिकांचाही जोर असतो. तसेच श्रावण महिन्यात मांसाहार केला जात नाही. त्यामुळे श्रावण सुरु होणऱ्यापूर्वी येणाऱ्या आषाढ महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात मांसाहारी जेवाणांवर जोर असतो.

मोठ्या प्रमाणावर चाललेल्या या आखाडी यात्रांमुळे आठवडे बाजारात कोंबड्या-बोकडांचे दर वाढले आहेत. शनिवारच्या तारळे व मंगळवारी नागठाणे येथे भरणाऱ्या बाजारात तीनशे रुपयांपर्यंत मिळणारे कोंबडे आता 700 ते 800 रुपयांपर्यंत गेले आहेत. तसेच 20 – 25 रुपयांना मिळणारी कोंबड्याची पिले 100 रुपयांपर्यंत किंमती सांगत आहेत. सद्य परिस्थितीला नागठाणे, तारळे येथील कोंबड्या बकऱ्यांचे बाजार “फुल्ल’ चालले आहेत. 

आषाढातील देणगतीतही बऱ्याच तऱ्हा आषाढातील या देणगतीतही बऱ्याच तऱ्हा आहेत. काही भुताखेतांना, देवांना कोंबडा-कोंबडी ही काळ्या रंगाचीच लागते, तर काही देणगतींना उलट्या पिसांची कोंबडी हवी असते. काळ्या रंगाच्या कोंबड्यांना इतर कोंबड्यांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहेत, तर उलट्या पिसांच्या कोंबड्या अभावानेच असल्याने संबंधित मालक ग्राहकांची नड पाहून मनाला येईल तो दर सांगत आहेत. किलोभरही वजन नसणाऱ्या अशा कोंबड्यासाठी सध्या ते रुपये मोजावे लागत आहे. मात्र, पैसे कितीही मोजावे लागले तरी नागरिक त्यात कमी पडत नाहीत. मोठ्या हौसेने या यात्रा करत आहेत. गावोगावी या देणगती जोरात सुरू आहेत.

No comments

Powered by Blogger.