Your Own Digital Platform

सुळेवाडीत बालआरोग्य तपासणी शिबीर


दहिवडी : सुळेवाडी, ता. माण येथे बेल भंडारा विचार मंच आणि ग्रामस्थांच्यावतीने बालआरोग्य तपासणी आणि उपचार शिबीर आयोजित करण्यात आले.

सुळेवाडी येथे बेलभंडारा विचार मंच व ग्रामस्थांच्या वतीने शून्य ते सहा वयोगटातील बालकांची मोफत आरोग्य तपासणी व उपचार करण्यात आले. राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेअंतर्गत गावातील सर्व मुलांना जंतनाशक औषध देण्यात आले. जंतामुळे लहान मुलांना होणाऱ्या आजाराची माहिती व ते होऊ नये यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांची सविस्तर माहिती पालक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, ग्रामस्थ यांना देण्यात आली. सुळेवाडी गावातील अंगणवाडीला आण्णासाहेब गेजगे, अध्यक्ष अखिल भारतीय होलार समाज संघटना व बेलभंडारा विचार मंचच्या वतीने गॅस सिलेंडर व शेगडी भेट देण्यात आली. कार्यक्रमास सुळेवाडी गावचे पोलीस पाटील, डॉ. दीपिका वीरकर, डॉ. शीतल शिंगाडे, अंगणवाडी सेविका आशा वर्कर उपस्थित होते.