नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी


खटाव : तिर्थक्षेत्र नागनाथवाडी, ता. खटाव येथे श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी राज्यातील विविध भागातून हजारो भाविकांनी नागनाथाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच गर्दी केली होती. त्यामुळे भाविकांची दर्शनासाठा महाद्वारापर्यंत रांगा लागल्पा होत्या. यावेळी ओम नमः शिवाय’ नागनाथ महाराज की जयं’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

श्रीनागनाथ देवस्थान लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने पावित्र श्रावणमासात व शिवरात्रीच्या पर्वकाळात देशाच्या विविध प्रांतातून हजारोच्या संस्थेने भाविक दर्शनासाठी येतात. तिर्थक्षेत्राकडे येण्यासाठी बुध व ललगुणकडून चांगला व जवळचा मार्ग उपलब्ध आहे. गेल्या काही वर्षात भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. भाविकांच्या सोयीसाठी श्रावणातील प्रत्येक दिवशी मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय नागनाथ सेवा मंडळाने घेतला आहे. गेल्या वर्षापासून किर्तन, प्रवचन सेवेबरोबर मंदिरात विविध धार्मिक उपक्रम राबविले जात आहेत. श्रावणातील तिसऱ्या सोमवारी येथे नागनाथाची यात्रा मोठया प्रमाणात भरली. येरळा नदीच्या काठावर मेवा-मिठाईची दुकाने, सौंदर्यप्रसाधानाचे स्टॉल, पाळणा घर, अशी विविध दुकाने थाटली आहेत.

 येरळा तीरावरील तिर्थक्षेत्री आज स्वयंभू शिवलिंगाचे व बालरूपी नागराजांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. प्रशासनाच्या सुचनेनुसार नागराजाचे फोटो काढण्यास व त्यांना स्पर्श करण्यास भाविकांना मनाई केली आहे. यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये; यासाठी पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

No comments

Powered by Blogger.