युवतीचे बनावट फेसबुक खाते खोलणार्‍यावर गुन्हा


सातारा : युवतीचे फेबुकवर बनावट खाते खोलून तिची बदनामी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे.सातार्‍यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या युवतीने सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्यातील एका तालुक्यातील युवती सातार्‍यातील नामवंत महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ती युवती अन संशयित पुष्पम पाटील रा. देवी कॉलनी,सातारा याची महाविद्यालयात अोळख झाली होती.

त्यानंतर पुष्पम हा तिला मैत्री करण्यासाठी दबाव टाकत होता. मात्र त्याच्या दबावाला ती युवती दाद देत नसल्याने चिडलेल्या पाटीलने त्या युवतीचे फेसबुकला बनावट खाते खोलले. त्या खात्यावरुन तो युवतीच्या अोळखीच्या लोकांशी अश्लील चॅटिंग करत होता.

सोमवारी त्या युवतीच्या भावाच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर पुष्पम याला जाब विचारला असता माझ्याशी पंगा घेतला की,असेच होते. असे म्हणत त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली.

त्यानंतर त्या युवतीच्या नातेवाईकांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीत पुष्पम याची आई काही दिवसांआधी तक्रारदार युवतीला तू माझ्या मुलाशी बोल असे म्हणत दबाव टाकत असल्याचे नमुद केले आहे.याचा तपास पो.नि. नारायण सारंगकर हे करत आहेत.

No comments

Powered by Blogger.