दहिवडी आयटीआय कॉलेजची दुरवस्था


दहिवडी : तालुक्‍याच्या मुख्य ठिकाणी असणाऱ्या आय.टी.आय कॉलेजचा परिसर व इमारत एखाद्या शहरातील कॉलेजला लाजवेल अशी आहे. मात्र याच इमारतीची सध्या दुरवस्था झाली आहे. शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी येवूनही इमारतीची अशी अवस्था झाल्यामुळे पालक वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

घराची कळा आंगण सांगते’ असे म्हणतात. परंतु, दहिवडीच्या आयटीआय कॉलेजमध्ये उलटा प्रकार दिसत आहे. या कॉलेजला शासनाच्या कोट्यवधीच्या निधीमुळे प्रशस्त इमारत इमारत मिळाली आहे. मात्र, याची कॉलेज व्यवस्थापनाला याची नीट निगा राखता आली नाही. इमारत बाहेरून दिसायला देखणी आहे. प्राचार्य कक्ष व स्टाफ ऑफिस सुसज्ज आहे. मात्र, आत जाताच फुटलेली शो-केस, मोडलेली बाके, नळ नसलेले हात धुण्याचे बेसिन, स्वच्छता गृह, पिण्याच्या पाण्याचे असणारे फिल्टर सगळे भंगारात जमा करण्याच्या लायकीचे झाले आहेत. कॉलेजजवळ वस्तीगृहांचे काम नक्की केले आहे की नाही, असाच प्रश्न पालकांना पडलेला आहे. 

बाहेरून फक्त उंच अशी इमारत आत जाताच खेळाचे मैदान तयार केल्यासारखे दिसते. सहा खोल्या बाकी, बंद अवस्थेत स्वच्छतागृह, स्नानगृहामधील नळ कनेक्‍शन गायब अशी तऱ्हा याठिकाणी आहे. ठेकेदारांनी इमारत उभी करताना आतील बाजूला उभे केलेले लोखंडी खांब देखील तसेच सोडले आहेत. मात्र, त्यांनी बाहेरून रंगरंगोटी छान केली दिसून येते. जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश घेऊन या ठिकाणी येत आहेत. मात्र, त्यांना राहण्याची व्यवस्था व कॉलेजमधील असणारी अस्वच्छता पाहून नाराजी व्यक्त होत आहे.

No comments

Powered by Blogger.