दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू


वाई : वाई-पाचगणी रस्त्यावरील गोशाळेजवळ दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात आवकाळी (ता. महाबळेश्‍वर) येथील युवकाचा मृत्यू झाला. अर्जुन भिलारे असे अपघातातील मृत युवकाचे नाव आहे. हा अपघात मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत वडील लक्ष्मण गणपत भिलारे यांनी वाई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

अर्जुन भिलारे (वय 22) हा मंगळवारी कामानिमित्त वाई येथे आला होता. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अर्जुन काम आटोपून वाईहून आवकाळीकडे आपल्या दुचाकीवरुन निघाला होता. वाई-पाचगणी रस्त्यावरील गोशाळेजवळ आला असताना पावसामुळे त्याची दुचाकी घसरली. या अपघातात अर्जुनच्या डोक्‍याला गंभीर जखम झाली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. अपघाताची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बी. बी. येडगे करत आहेत.

No comments

Powered by Blogger.