लोणंदच्या मल्लांचे शालेय स्पर्धेत यश


लोणंद : लोणंदच्या मालोजीराजे विद्यालयाचे विद्यार्थी तसेच लोणंद लालमाती कुस्ती केंद्रातील मल्ल शालेय मॅटवरील कुस्ती स्पर्धेत असवली, ता. खंडाळा येथे झालेल्या शालेय म्याट वरील तालुका स्तरीय (फ्री स्टाईल) कुस्ती स्पर्धेमध्ये देदिप्यमान यश संपादन केले.

मालोजी राजे विद्यालयात लोणंद येथील पाच मल्लांनी लोणंदच्या लालमाती कुस्ती केंद्र येथे प्रशिक्षण घेतले आहे. या पाच मल्लांपैकी दोन मल्ल तालुका स्तरावर प्रथम क्रमांकाने व तीन मल्ल द्वितीय क्रमांकाने विजयी झाले आहेत. विशाल शंकर बोराटे (63 किलो गट-प्रथम, कृष्णा प्रकाश तेली (45 किलो गट – प्रथम), साहिल मुरलीधर मोरे (42 किलो गट – द्वितीय, शुभम मुरलीधर मोरे (46 किलो गट – द्वितीय), गौरव भगवान धायगुडे (54 किलो गट – द्वितीय).

 या पाच खेळाडूंचे अभिनंदन शालेय क्रीडा शिक्षक तथा मार्गदर्शक ठाकरे यांनी केले. तसेच या मल्लांना नवनाथ शेंडगे (महाराष्ट्र चॅपियन) व उपाध्यक्ष गणेश आप्पा पवार यांनी प्रशिक्षक दिले होते. लोणंदच्या लाल माती कुस्ती केंदाचे अध्यक्ष मंगेश आबा क्षीरसागर यांनी यावेळी सांगितले की लोणंदच्या केंद्रातून राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच लोणंदचे मल्ल हे येणाऱ्या काळात देशापातळीवर लोणंदचे नाव उंचावतील अशी ग्वाही दिली.

No comments

Powered by Blogger.