दहा लाखांच्या जुन्या नोटांसह संशयित ताब्‍यात


कुडाळ/भुईंज : पाचवड (ता. वाई) येथे जुन्या चलनी नोटा घेऊन नवीन चलनी नोटा बदली करण्यासाठी आलेल्‍या संशयिताला भुईंज पोलिसांनी रंगे हात पकडले. बाजीराव अण्णा मोरे (रा. रांनगेघर ता. जावळी) असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी बाजीरावकडून दहा लाखांच्या जुन्या नोटा जप्त केल्‍या आहेत. या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पाचवड बैल बाजारात सायंकाळी आठच्या सुमारास एक जण जुन्या चलनी नोटा घेऊन येत असल्याची माहिती अज्ञात खबऱ्याकडून भुईंज पोलिसांना मिळाली होती. याबाबतीत अधिक माहिती घेवून भुईंज पोलिसांनी संशयिताची तपासणी केली असता त्याकडे दहा लाख रुपयांची बॅग आढळून आली. पोलिसांनी या बॅगसह मोरे यास ताब्‍यात घेतले आहे.

No comments

Powered by Blogger.