Your Own Digital Platform

काशीळमध्ये अवैध दारू साठ्यावर छापा
नागठाणे : काशिळ (ता. सातारा) येथे उपविभागीय कार्यालय व बोरगाव पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत अवैध दारू साठ्यावर छापा मारला.दारुच्या एकोणीस बॉक्स (912बाटल्या) असा 47,424 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. उपविभागीय पोलीस अधिकारी राजमाने यांना खास बातमीदार मार्फत काशिळ येथे दारूचा अवैध साठा असल्याची माहिती मिळाली.

 त्या माहितीच्या आधारे शुक्रवारी बोरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी व उपविभागीय कार्यालयाचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम यांनी त्यांच्या कर्मचार्‍यासह काशिळ येथील हसन दिलावर कागदी (वय 42) यांच्या घरावर छापा मारून त्यांच्या घराच्या पाठीमागील खोलीत देशी दारुचे 19 रंगीत बॉक्स जप्त केले. मुद्देमाल हा सुमारे 47, 424रुपये किमतीचा आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष चौधरी, पोलीस उपनिरिक्षक नानासाहेब कदम, पो. कॉन्स्टेबल राजू शिखरे, चव्हाण, पी. एन. ढाणे, ए. एम. साळुंखे यांनी कारवाई केली.

काशीळ परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध धंदे सुरू असल्याबद्दल नागरिकांतून कारवाई करण्याची मागणी होत होती. या कारवाईनंतर अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले असले तरी कारवाईत सातत्य ठेवण्याची गरज आहे.