वाईत मराठा क्रांती मोर्चाचा एल्गार


वाई : गुरुवारी पुकारण्या आलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या बंदला वाई शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तालुक्‍यातील गावागावातील हजारोच्या संख्येने एकत्र आलेल्या मराठा बांधवानी वाई शहरातून भव्य दुचाकी रॅली काढून ठिय्या आंदोलन केले. यावेळी “एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणांनी वाई शहर दुमदुमून गेले.

गुरुवारी सकाळी 9 वाजता वाई तालुक्‍यातून हजारोंच्या संख्येने मराठा बांधव वाईमध्ये एकत्र आले होते. शिवाजी चौकातून मराठा क्रांती मोर्चाच्या हजारो कार्यकर्त्यांनी मोटर सायकल रॅलीचा प्रारंभ केला. ही महारॅली शिवाजी चौकातून वाई एसटी स्टॅण्ड, सिध्दनाथवाडी, महागणपती पुलावरून, शाहिर चौक गंगापूरी, भाजी मंडई, वाई नगरपालिका, रविवारपेठ, जामा मशीद यंग रविवार चौकातून किसनवीर चौक, सोनगिरवाडी, बावधन नाक्‍यावरून प्रांत कार्यालयात प्रातांधिकारी अस्मिता मोरे यांना निवेदन देवून शिवाजी चौकात ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी समारोप करण्यात आला. यावेळी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते.

यानतंर शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी जम्मू-कश्‍मीर येथील शहीद झालेले वीर मेजर कौस्तुभ राणे व मराठा आंदोलनात राज्यभरातून आरक्षण व इतर मागण्यासाठी बलिदान दिलेल्या 26 मराठा बांधवांना श्रध्दांजली वाहण्यात आली. समाजातील युवक, अबाल वृध्द, महिला यांनी बावधन नाका चौकात भर रस्त्यात ठिय्या मारून अंदोलनाची धार तीव्र केली. यावेळी एक मराठा लाख मराठाच्यावतीने मान्यवरांनी आपले विचार प्रकट करून शासनाला जाग येण्यासाठी गोंधळ घालण्यात आला. अंदोलनस्थळी आ. मकरंद पाटील यांनी भेट देवून पाठिंबा दिला. आंदोलन अकरा वाजता सूरू होवून दुपारी तीनपर्यंत ठिय्या अंदोलनाची सांगता करण्यात आली. दुपारी तीन नतंर वाईच्या महागणपती घाटावर कृष्णानदीत उतरून आरक्षणासाठी नदीत उतरून शासनाच्या विरोधात जलअंदोलन केले. वाई पोलिस स्टेशनच्यावतीने उपविभागिय पोलिस निरिक्षक पोलिस निरिक्षक, उपनिरिक्षक, चाळीस पोलिस कर्मचारी व होमगार्ड यांच्या माध्यमातून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दरम्यान वाई तालुक्‍यातील सर्व गावातून शंभर टक्के बंद पाळून गांवामधून मराठा अंदोलनाची धार तीव्र करण्यासाठी गावांच्या वेशीवर ग्रामस्थांनी एकत्र येवून घोषणाबाजी करून निषेध केला व वाईच्या महारॅलीमध्ये सामिल झाले. यामध्ये मांढरदेव, बावधन, ओझर्डे, पसरणी, मेणवली, धोम, शेंजूरजणे, कवठे, केंजळ यामध्ये रास्ता रोको करण्यात येवून चक्काजाम करण्यात आला.

No comments

Powered by Blogger.