Your Own Digital Platform

वारूंजीकरांनी दाखविला बीव्हीजीवर विश्वास


वारुंजे : वारुंजे (ता. खटाव, जि. सातारा) विविध कार्यकारी सेवा सोसायटीतर्फे शुक्रवारी (दि. 24 ऑगस्ट) शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बीव्हीजीचे विकास अधिकारी वैभव गोडसे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी सोसायटीचे चेअरमन सर्जेराव पाटील, व्हाईस चेअरमन आनंदराव तोरवाडे, सचिव गणेश पाटील, प्रगतशील शेतकरी आनंदराव पाटील, उमेश डांगे, तानाजी देशमुख, बीव्हीजीचे जिल्हा व्यवस्थापक वैभव माने आदी उपस्थित होते. वारुंजे गावामध्ये ऊस हे प्रमुख पीक आहे. या पिकासाठी येथील शेतकऱ्यांनी बीव्हीजी कृषी तंत्रज्ञानाचा उपयोग करून उत्पादन दुप्पट होत असल्याचा अनुभव घेतला आहे.

 येथील शेतकऱ्यांना बीव्हीजी कृषी तंत्रज्ञानाचा फायदा झाल्याने गावातील सहकारी सोसायटीने अटल पणन अभिअयानांतर्गत सभासद शेतकरी बांधवांना या तंत्रज्ञानाचा लाभ करून देण्याच्या हेतूने शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास गावातील सभासद शेतकरी उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतीमध्ये विषमुक्त शेतमाल उत्पादनासाठी वाहून घेण्यासाठीची घोषणा केली.