Your Own Digital Platform

वटवाघळांना वन्यजीव कायद्याने सरंक्षण हवे


सातारा : वटवाघळांना वन्यजीव कायद्याने सरंक्षण दिले पाहिजे.1972 च्या वन्यजीव कायद्यात बदल करणे आवश्‍यक असून या मध्ये वटवाघळांना समविष्ट करून संरक्षण मिळायला हवे,अशी मागणी वटवाघुळ संशोधक डॉ. महेश गायकवाड यांनी केली.

निपाह व्हायरस केरळमध्ये आला आणि मग वटवाघळांविषयी भीती आणखी वाढू लागली.अनेकांनी वटवाघळ राहतात ती झाडे सुद्धा तोडायला सुरुवात केली.भारतात 123 प्रजातीची वटवाघळ सापडतात मात्र त्यातील फक्त 2 जातींनी वन्यजीव कायदा 1972 नुसार संरक्षण दिले आहे, या दोन प्रजाती दक्षिण भारतात आढळून येतात, महाराष्ट्रात मात्र एकाही प्रजातीला संरक्षण नसून शासन दरबारी फक्त अनास्था आहे. याविषयी वन विभाग तर कोणतीही संरक्षणाची जबाबदारी घेत नसल्यामुळे सामान्य शेतकऱ्यांचे नुकसान होत असून याची नुकसान भरपाई मिळत नाही, कारण यांना वन्यजीव कायद्यानुसार संरक्षण नाही,असेही ते म्हणाले.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मासे पकडण्याचा जाळीने शेतीला चारही बाजूने संरक्षण दिले जाते, यात बागांना संरक्षण करणेसाठी लावलेली ही जाळी शेकडो वटवाघळांसाठी प्राणघातक ठरत आहे. यात सातारा, सांगली, नाशिक, पुणे जिल्यातील अनेक ठिकाणी या नायलॉनच्या जाळ्यात अडकून अनेक वटवाघळे आणि पक्षी मरत आहेत.कोकणात तर वटवाघळाचे तेल काढण्याचे छोटे कारखाने असल्याचे सर्रास पहावयास मिळते मात्र हे कोणीही थांबवू शकत नाही .या तेलाचे कोणतेही परिणाम होत नाहीत मात्र अंधश्रध्दा मोठ्या प्रमाणातअसल्याने शहरी सुशिक्षित लोक याची मागणी जास्त करतात,अशी माहितीही त्यांनी दिली.

सध्या अनेक ठिकाणी बोर, द्राक्ष, सीताफळ, डाळींब अश्‍या फळबागांचे नुकसान काही फळाहारी वटवाघळ करीत असून यात नुकसानभरपाई म्हणून शेतकऱ्याना काहिच मिळत नाही कारण आपल्या वन्यजीव कायद्यानुसार यांना संरक्षण नाही. त्यामुळे शेतकरी आणि वन्यजीव संघर्ष वाढीस जात आहे असेही, त्यांनी स्पष्ट केले.