“त्या’ महिलेची मुलासह आत्महत्याच


महाबळेश्वर : अंबेनळी घाटात अर्धवट जळालेल्या स्थितीत सापडलेल्या शितल ललित गंगवार यांच्या मृतदेहाजवळ उभ्या असलेल्या स्कूटीच्या डीकीमध्ये पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीवरून शितल गंगवार यांनी आत्महत्याच केली असावी, या निर्णया पर्यंत पोलिस तपास पोहचला आहे. दरम्यान तपासात कोणतीही तृटी राहु नये यासाठी महाड पोलिस सर्व शक्‍यता पडताळुन पहात आहे. पुढील तपास महाड पोलिस करीत आहेत.

पोलादपूर पासून 12 किमी अंतरावर पायटा गावाच्या हद्दीत काल सकाळी महाबळेश्वर पोलादपुर रस्त्याच्या कडेला एका आंब्याच्या झाडाखाली एक महिला व लहान मुलाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळुन आला होता. ती महिला महाड येथील असून घरात कोणालाही काहीही न सांगता 6 ऑगस्ट रोजी दुपारी निघुन गेली होती. या संदर्भात महाड शहर पोलिस ठाण्यात मिसिंग दाखल होती. या दोन मृतदेहांजवळ ज्वलनशील पदार्थ असलेल्या बाटल्या आणि एक दुचाकी आढळुन आली होती. या दुचाकीच्या डिकीमध्ये पोलिसांना एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीच्या अधारे शितल यांनी आत्महत्याच केली असावी, असा निष्कर्ष महाड पोलिसांनी काढला आहे. मात्र चिठ्ठीतील अक्षर हे शितल यांचेच आहे का? की पोलिस तपासाची दिशा चुकविण्यासाठी कोणी ही चिठ्ठी लिहुन गाडीच्या डिकीमध्ये टाकली याबाबत महाड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

No comments

Powered by Blogger.