Your Own Digital Platform

तरुणांनी उद्दिष्टांशी प्रामाणिक रहावे : खा. शरद पवार


कराड : तरुणांकडे नाविन्याचा अविरत शोध, दूरदृष्टि व आवडत्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करण्याची तयारी हवी, उद्दिष्टांशी प्रामाणिक रहायला हवे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांनी केले. येथील साईसम्राट इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस अ‍ॅण्ड हॉटेल मॅनेजमेंट, ओमसाई एक्स्पोर्ट फूडस्, साईजीत फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीची सखोल माहिती घेऊन खा. पवार यांनी समाधान व्यक्त केले.

खा. पवार म्हणाले, बदलत्या काळानुसार बदलणे ही वर्तमान काळाची गरज आहे. आयुष्याच्या प्रत्येक दिवसांचा सन्मान करा. तरुणांनी शेतीवरील कुटुंबाचा भार कमी करणे गरजेचे आहे. त्यासाठी आयात निर्यात, कृषी प्रक्रिया, कृषी व्यवसाय, अन्नप्रक्रिया, मार्केटिंग, पॅकेजिंग, आटोमायजेशन, आर्टिफिशियल इंटलिजीयन्स, इंटरनेटमुळे होणारे जागतिक स्तरावरील बदल आत्मसात करून बदलांना सामोरे गेले पाहिजे. आज कुशल तरुणांची कमतरता आहे. म्हणून विद्यापीठांनी जागतिक व स्थानिक उद्योगांची गरज लक्षात घेऊन बृहत आराखड्यात रोजगार देणार्‍या शिक्षणाचे नियोजन करणे आवश्यक आहे.

यावेळी खा. धनंजय महाडिक, आ. हसन मुश्रीफ, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे विश्‍वस्त डॉ. संजय पाटील, निवेदिता माने, छत्रपती मालोजीराजे, संचालक तानाजीराव मोरे, सम्राट पाटील, सूरजितसिंह पाटील, दिगंबर माळी, एम. ए. पाटील, उत्तम जाधव, विलास झाडे, शाहूराज पाटील, प्रा. विजय जाधव, प्रा. रोहन, प्रा. शिल्पा, रोहित मोहिते, यशवंत शिरभावे उपस्थित होते.