पोलिस पाटील कार्यालयासाठी निवेदन


म्हसवड : माण तालुक्यातील पोलिस पाटील संघटनेच्या वतीने माण पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शेलार यांना गावात ग्रामपंचायत कार्यालयात पोलिस पाटील कार्यालय व्हावे या मागणीचे निवेदन देण्यात आले . माण तालुक्यातील पोलिस पाटील यांना त्यांच्या गावात गावगाडा संभाळताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत असून ग्रामपंचायत कार्यालयात पोलिस पाटील कार्यालय देण्यात यावे अशी मागणी पोलिस पाटील संघटनेच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे गट विकास अधिकारी शेलार यांना करण्यात आली आहे.

याबाबत तातडीने कार्यालय देण्याबाबत संबंधितांना आदेश देणार असल्याचे आश्वासन गट विकास अधिकारी शेलार यांनी दिली असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड यांनी दिली.

गावात पोलिस पाटीलसाठी स्वतंत्र कार्यालय नसल्याने कुचंबना होत आहे तर स्वतंत्र कार्यालय नसल्याने पोलिस पाटलांना भेटण्यासाठी ग्रामस्थांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे सन 2012 मध्ये शासन निर्णय झाला असून नविन ग्रामपंचायत कार्यालयात त्यांना स्वतंत्र कार्यालय देण्याबाबत स्पष्ठ आदेश असतानाही आजअखेर त्याची अंमलबजावणी झालेली नाही.

याबाबतचे निवेदन माण तालुका पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड यांचे हस्ते संघटनेच्या वतीने देण्यात आले .

यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष महेश शिंदे, उपाध्यक्ष हर्षद शिर्के , भाऊसाहेब चव्हाण , सुभाष काळेल , रामचंद्र घुटुकडे, दादा आटपाडकर , सयाजी लोखंडे, मोनाली बनसोडे, महादेव साठे , सुरेश चंदनशिवे आदी पोलिस पाटील उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.