Your Own Digital Platform

दुभाजकांमध्ये फुलांऐवजी झाडाझुडपांचे साम्राज्य


वाई : वाई शहरातील रस्त्यावर नव्याने बांधण्यात आलेल्या दुभाजकाच्या सुशोभीकरणास बांधकाम विभागाला मुहूत मिळत नसल्याने सध्या या दुभाजकांमध्ये फुलांऐवजी वेली तसेच झाडाझुडपांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

वाईमार्गे पाचगणी महाबळेश्वरला जाणार्‍या पर्यटकांच्या व शहरातील नागरिकांच्या सोईचा आणि शहराच्या सुंदरतेत भर घालणार्‍या रस्त्याच्या मधल्या दुभाजकावर फुलझाडे ऐवजी संबधित विभागाच्या दुर्लक्षामुळे गवत व झुडुपे उगवल्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. मुंबई-पुणे-साताराहून येणारे हजारो पर्यटक वाईमार्गे पाचगणी महाबळेश्वरला प्रवास करतात. त्याच्या व नागरिकांच्या सोईसाठी उपयुक्त व शहराच्या सुशोभीकरणात भर घालणार्‍या सह्याद्रीनगर ते बसस्थानकापर्यतचे चार पदरी रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.

 रस्ता रुंदीकरणाच्या वेळेस ब्रिटीशकालीन वडाची झाडे अतिशय निर्दयीपणे विकासाच्या नावाखाली हटविण्यात आली. ती नवीन झाडे लावण्याच्या बोलीवर परंतु रस्ता रुंदकरणामुळे वाहतुकीची कोंडी होत नाही. मात्र, मधल्या दुभाजकावर गवत व झुडुपे उगवल्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळ्यातच संबंधित विभागाकडून सुशोभीकरणाची झाडे लावली जावीत अशी अपेक्षा असताना संबंधित विभागाकडून तसे होताना दिसत नाही. पावसाळ्यानंतर फोटोच्या पोझ देण्यासाठी फुलांच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार असेल तर ते अतिशय गंभीर असून त्यासाठी वाई नागरिक व पर्यावरण प्रेमी बांधकाम विभागाच्या विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. तरी त्वरित संबंधित विभागाने दुभाजकावर फुलांची झाडे लावून शहराच्या सौंदर्यात भर घालावी, अशी मागणी जोर धरत आहे