वकिल संघटनेचा मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा


सातारा :  9 ऑगस्ट क्रांतिदिनी मराठा क्रांतीमोर्चामध्ये सातारा येथील मराठा वकिल संघटनांनी बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सातारा जिल्हा न्यायालयामध्ये जरी कामकाज सुरू असले तरी देखील सर्व मराठा वकिलांनी आज काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेवून जिल्हा न्यायलय ते सातारा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. तसेच मराठा क्रांती मोर्चा ठिय्या आंदोलनात सहभाग नोंदवला. तसेच सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंधल यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले.

सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी त्यांचे म्हणने ऐकूण घेतले व आपली बाजू शासनाकडे मांडू, असा विश्वासदेख्रील यावेळी वकिल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला. निवेदन दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद सांधताना विकिल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना माहिती दिली.

मराठा आंदोलनामध्ये ज्यांच्यावर विनाकारण गुन्हे दाखल झाले आहेत. जी मुले निरापराध आहेत ज्यांच्यावर 307 व 353 सारखे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत. त्यांचा त्यामध्ये सहभाग नसेल तर त्यामधील कलमे कमी केली जावीत. मराठा समाजाला आरक्षण मिळावेत.×ऍट्रॉसिटीच्या बाबतीत कायदा शिथील करावा. या प्रकारच्या मागण्याचे निवेदन दिले. आजपर्यंत 58 मोर्चे शांततेत काढले. मराठ्यांनी गवताच्या काडीलादेखील हात लावला नव्हता. आणि 25 जुलै रोजी समाजकंटकांनी मराठा मोर्चामध्ये जाळपोळ व दगडफेक केली. यामध्ये मराठा आंदोलनाला गालबोट लावले होते. 

मराठा आंदोलन बदनाम करण्याचे काम काही जणांनी केले. मात्र, त्यामध्ये निरपराधांवरती गुन्हे दाखल झाले. शासनाने याबाबत मराठा समाजाचा उद्रेक होवू न देता त्यांना दगड हाती घेण्याची वेळ आणू नये, याकरता शासनाने तातडीने निर्णय घेणे आवश्‍यक आहे, असे सांगितले. या बंद मोर्चामध्ये सर्व मराठा वकिलांनी कामबंद आंदोलन केले असले तरी सातारा जिल्हा न्यायालयाचे कामकाज सुरू आहे. तसेच बंदच्या अनुषंगाने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ठिय्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

No comments

Powered by Blogger.