आंदोलकांचे प्रांताधिकार्‍यांना गाजर


कराड : मराठा आरक्षणासाठी महिलांचे गेल्या सात दिवसांपासून येथील दत्त चौकात ठिय्या आंदोलन सुरू असून मंगळवारी 13 मराठा बांधवांनी मुंडण करून आणि आंदोलक महिलांनी प्रांताधिकार्‍यांना गाजर देवून शासनाचा निषेध केला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या एकमुखी मागणीसाठी मंगळवारी येथील दत्त चौकातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर मराठा समाज बांधवांनी आपले मुंडण केले. तसेच शासनाचा तीव्र निषेध नोंदविला. मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मराठा बांधवांनी आंदोलनस्थळी जोरदार घोषणाबाजी केली. तेरा मराठा बांधवांनी मुंडण करून शासनाचा तीव्रपणे निषेध नोंदविला, तर आंदोलनस्थळी आलेल्या प्रांताधिकार्‍यांना महिलांनी गाजर देत शासनाचा अनोख्या पध्दतीने निषेध नोंदविला. यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव आणि भगिनी उपस्थित होत्या.

No comments

Powered by Blogger.