जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन ब्ल्यु फोर्सची निदर्शने


सातारा : नांदेड जिल्ह्यातील मग्नपुरामध्ये वडार समाजातील मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आलेल्या घटनेचा रिपब्लिकन ब्ल्यु फोर्सच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

राज्यात दलितांवरील अत्याचार थांबलेले नाहीत. त्यामध्ये वाढ होत असून नुकतीच नांदेड जिल्ह्यात माणुसकीला काळींबा फासणारी घटना घडली. दलित समाज आज ही उपेक्षित आहे. या समाजावर अन्याय होत असल्याच्या घटना वारंवार या पुरोगामी राज्यात घडत असून अत्याचार व खून करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यावेळी दादासाहेब ओव्हाळ, रमेश विटकर, बाबा ओव्हाळ, मदन खंकाळ, सागर सावंत, संतोष ओव्हाळ, सोमनाथ धोत्रे, सिध्दार्थ समिंदर यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.