स्व. विनोद भोसलेंच्या कुटुंबियांना मराठा क्रांती मोर्चातर्फे आर्थिक मदत


फलटण :  होळचे उपसरपंच विनोद भोसले यांनी खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. या घटनेने त्यांच्या कुटुंबाचे छत्र हरपले. यामुळे माणुसकीच्या भावनेतून त्यांच्या कुटुंबातील लोकांना सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा समन्वयक यांनी आर्थिक मदत केली. यावेळी समाजातील इतर दानशूर व्यक्तींनी लहान मुलांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

विनोद भोसले यांच्या कुुटुंबाची जेमतेम दीड एकर जमीन आहे. यावर त्यांचा चारितार्थ चालत होता. भोसले यांच्या आत्महत्येमुळे कुटुंब आर्थिक संकटात सापडले होते.त्यांच्या दोन चिमुकल्या मुलांच्या भवितव्यासाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी आर्थिक मदत केली आहे. ही मदत इतर लोकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत व्यक्त करून इतर समाजाती दानशूर व्यक्तींनीही मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.