चोरटी वाळू वाहतूक करणारा ट्रक ताब्यात


म्हसवड :विरकरवाडी गावच्या चौकात चोरटी वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर म्हसवड पोलिसांनी कारवाई केली असूनही वाळूची चोरीही दिवसाढवळ्या सुरू होती.

याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, विरकरवाडी गावाच्या हद्दीतून दुपारी पाऊणे तीनच्या सुमारास माणगंगा नदी पात्रातून ट्रक (एमएच 10 एडब्ल्यू6868) वाळू चोरून घेवून निघाल्याची खबर म्हसवड पोलिसांना मिळाली. यानंतर सपोनि मालोजीराव देशमुख यांनी कर्मचाऱ्यांसह विरकरवाडी चौकात सापळा रचून ट्रक पकडला. ट्रकमध्ये 4 हजारांची एक ब्रास वाळू आढळली. पोलिसांनी संबधित ट्रक ताब्यात घेवून ट्रकचालक वृषभ विठ्ठल कांबळे वय 36 रा. अंकली, ता. मिरज यास अटक केली आहे.

 सपोनि देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष बागल, बर्गे, नदाफ यांनी केली आहे. दरम्यान, प्रांताधिकारी यांच्या पथकातील तलाठी अकडमल, तलाटी संतोष ढोले, बोबडे आण्णा यांनी देवापुर गावच्या हद्दीत वाळू चोरीच्या उद्देशाने संशोयित रित्या आढळून आलेल्या पाच दुचाकी व एक ट्रक्‍टरवर कारवाई करून वाहने म्हसवड पोलिसांच्या ताब्यात दिली.

No comments

Powered by Blogger.