आनेवाडी टोलनाक्यावर शुकशुकाट


लिंब :पुणे-बेंगलोर महामार्गावरील नेहमीच वाहनांनी गर्दी असलेल्या आनेवाडी टोलनाक्यावर मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमुळे शुकशुकाट दिसत आहे.मराठा समाज बांधव मोठ्या प्रमाणात ठिय्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात बंदची हाक दिल्याने त्यास मोठा प्रतिसाद मिळाला आहे, महामार्गावरही या बंदचा असर पडल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद झाल्याचे चित्र दिसत आहे. महामार्गालागतची हॉटेल्‍स, ढाबे बंद आहेत.

दरम्यान, सातारा तालुक्यातील लिंब येथेही बाजारपेठ बंद ठेवण्‍यात आल्‍या आहेत. मराठा आरक्षणासाठी लिंबच्या ग्रामस्थांसह व्यापाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. परिसरातील मराठा आरक्षण समिती तसेच ग्रामस्थ ठिय्या आंदोलनात सहभागी झाले आहेत .

No comments

Powered by Blogger.