शाहूपुरी येथे क्रांतीदिनी हुतात्म्यांना अभिवादन
सातारा : शाहूपुरी येथील आपल्या शाहूपुरी माध्यमिक विद्यालयाच्यावतीने हुतात्मा स्मारक गेंडामाळ येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शालाप्रमुख सौ. एस. एस. क्षीरसागर, अध्यापक संजय बारंगळे, जगदीश सुपेकर यांच्यासह अध्यापक, दत्तात्रय कुचेकर व विद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी सौ. क्षीरसागर यांनी स्वातंत्र्य चळवळीचा आढावा घेऊन अनेक अनामिकांनी देशासाठी प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्या या अपूर्व त्यागाची जाणीव ठेवून सद्यस्थितीत लोककल्याणार्थ कार्यात निरपेक्ष वृत्तीने प्रत्येक भारतीयाने काम करण्याची गरज असल्याचे सांगितले.
Post a Comment