माळीनगर ( मायणी) येथे अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ


मायणी  : माळीनगर (मायणी) ता. खटाव येथे श्री संत सावंता बाबा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त दि. ४ ते ११ ऑगस्ट अखेर अखंड हरिनाम सप्ताह ,श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी व श्री सावता महाराज ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे .

सदर सप्ताह सोहळ्यात दि.४रोजी ह.भ .प.अंकुश महाराज, गोडसेवाडी , दि. ५ रोजी ह.भ.प. सतीश महाराज झेंडे ( तडसर ), दि.६ रोजी ह.भ.प. गोरख महाराज मठाचीवाडी, दि. ७रोजी ह. भ.प. गणेश लवहारे महाराज, आळंदी, दि.८ रोजी ह.भ.प. मोहनजी महाराज शेलार, बीड,दि.९रोजी ह.भ.प. नवनीत महाराज,करगणी, दि. १०रोजी सकाळी ९वांजता ह.भ.प. नारायण महाराज बार्शीकर यांचे काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे. दैनंदिन कार्यक्रमांमध्ये काकडा आरती, ज्ञानेश्वरी वाचन, हरिपाठ, कीर्तन ,जागर आदी कार्यक्रम होणार असून व्यासपीठ चालक म्हणून ह.भ.प. बाळकृष्ण महाराज निकम काम पाहणार आहेत.

No comments

Powered by Blogger.