Your Own Digital Platform

लोणंद येथे ट्रॅफीक पोलीसांना राख्या बांधुण आश्विनी करे व मैत्रिणींनी साजरा केला रक्षाबंधणाचा सण


लोणंद : लोणंद ता. खंडाळा या ठीकाणी ट्रॅफीक पोलीसांना राखी बांधुन एक अनोखा आगळावेगळा सण लोणंदमधील कु. आश्विनी भरत करे, व साजरा केला . पोलीस कर्मचारी यांना कोणत्याही सणाला आपल्या ड्युटीमुळे जाता येत नाही, ते प्रामाणिकपणे आपली ड्युटी बजावत असतात, रक्षाबंधणाच्या या सणालाही त्यांना कोठे जाता येत नाही. त्यांना आपल्या बहीनीचे आठवण होऊ नये म्हणून लोणंदमधील युवतींनी पोलिसांना राख्या बांधुण सण साजरा केला. 

आम्हास लोणंदमधील युवती व महिलांनी राख्या बांधुन बहीणीचे प्रेम दिले, त्यामुळे आज आम्ही आनंदी झालो आहोत. - ट्रॅफीक पोलीस पवार 

 राखी बांधतेवेळी एका पोलीस कर्मचारी याचे डोळे पाण्याने भरुन आले. लोणंद मधील आजचा महिलांच्या रक्षाबंधणाचा ऊपक्रम चांगला असुन त्यांनी आम्हास राखी बांधुण बहीणीची आठवण होऊ दिली नाही हा क्षण आम्ही पोलीस बांधव कधीही विसरु शकत नाही -ट्रॅफीक पोलीस देशमुख लोणंद )ज्यावेळी ती युवती राखी बाधुन झाल्यावर पोलिसाच्या पाया पडु लागली त्यावेळी त्या युवतीस व पोलीस कर्मचारी या दोहोंनाही गहीवरुन आले. बंधुपोलीसही न थांबता त्यांनी आपल्या बहीणीला एक गिप्ट देऊन आपले कर्तव्य बजावले.