अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे कराडात विसर्जन


कराड : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे गुरुवारी सायंकाळी कराडमधील कृष्णा- कोयनेच्या प्रीतिसंगमावर विसर्जन करण्यात आले. ना. सदाभाऊ खोत, ना. अतुल भोसले यांच्यासह कराडचे नगरसेवक यावेळी उपस्थित होते.स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलशाचे गुरुवारी शिरवळ येथे आगमन झाले. नियोजित कार्यक्रमानुसार अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे शनिवारी सकाळी कराडमध्ये आगमन होणार होते. मात्र, या कार्यक्रमात बदल करत अस्थिकलश सांगली जिल्ह्यात गुरुवारी दुपारी नेण्यात आला. तेथून सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अस्थिकलश कराडमधील कोल्हापूर नाका परिसरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा परिसरात ठेवण्यात आला होता. 

तेथून अस्थिकलश दत्त चौक, मुख्य बाजारपेठ या मार्गे चावडी चौकातून कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमावर नेण्यात आला. त्या ठिकाणी अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर ना. खोत, ना. डॉ. भोसले यांच्यासह मनोज घोरपडे, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपाध्यक्ष जयवंतराव पाटील, पुरुषोत्तम जाधव, बांधकाम सभापती हणमंतराव पवार यांच्यासह नगरसेवक, भाजप पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले.

No comments

Powered by Blogger.