Your Own Digital Platform

खानापूर येथील तरुण बेपत्ता


भुईंज : खानापूर येथील अंकुश संपत चव्हाण हा युवक सोमवारी रात्रीपासून बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी कुटुंबियांनी भुईंज पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

अधिक माहिती अशी, अंकुश संपत चव्हाण (वय 30) हे खानापूर स्टॉप (ओझर्डे, ता. वाई) येथे वास्तव्यास आहेत. सोमवार, 30 जुलै रोजी अंकुश घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेले आहेत. दोन दिवस झाले तरी अंकुश घरी परतला नसल्याने भांबावलेल्या कुटुंबियांनी अंकुश बेपत्ता झाल्याची तक्रारी भुईंज पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. याप्रकरणी सहाय्यक फौजदार आर. झेड कोळी हे अधिक तपास करत आहेत.