Your Own Digital Platform

युवा माहिती दूतांमार्फत शासनाच्या योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहचणार


सातारा : राज्य शासन नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत असते. या योजनांची माहिती “युवा माहिती’ दूतांमार्फत थेट लाभार्थ्यांपर्यत पोहणार आहे. आज जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांची युवा माहिती दूत या उपक्राबाबत सातारा आकाशवणीवर मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. ही मुलाखतीचे प्रसारण मंगळवार दि. 28 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 9. 30 आणि रात्री 9. 30 या वेळेत होणार आहे. 

या मुलाखतीत जिल्हा माहिती अधिकारी श्री. पाटील म्हणाले, युनिसेफच्या सहयोगाने राज्य शासनाचे उच्च शिक्षण विभागआणि तंत्र शिक्षण विभाग यांच्या प्रत्यक्ष सहभागाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने “युवा माहिती दूत’ हा उपक्रम हाती घेत आहे. विविध शाखांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयातील युवकांमार्फत शासकीय योजनांची माहिती प्रस्तावित लाभार्थ्यांपर्यंत थेटपणे पोहचविणे हे “युवा माहिती दूत’ या उपक्रमाचे खास वैशिष्ट्‌य आहे.

शासकीय योजनांच्या माहितीचा प्रसार हा मुख्यत्वे वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या आणि रेडिओ यांच्यामार्फत केला जातो. सोशल मीडियाचा होणारा उपयोग मर्यादित स्वरुपाचा आहे. शिवाय, शासकीय योजनांचे बहुतांश प्रस्तावित लाभार्थी हे अर्धशिक्षित, दारिद्रयरेषेखालील आणि दुर्गम भागातील असल्याने वृत्तपत्रे, दूरचित्रवाणीसंच अथवा रेडिओ ही माध्यमे ते वापरतात असे नाही. प्रस्तावित लाभार्थ्यापर्यत न पोहचणाऱ्या शासकीय योजना दुहेरी संवादातून त्यांच्यापर्यत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी राज्यातील समाजकार्याची आवड असलेल्या उत्साहीतरूण वर्गाचे सहाय्य घेण्याचा “युवा माहिती दूत’ या उपक्रमाचा महत्वाचा उद्देश आहे.राज्यात 6 हजारपेक्षा जास्त महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयामध्ये एकूण सुमारे 23 लाख पेक्षा जास्त विद्यार्थी शिकत आहेत. त्यापैकी किमान 5 ते 7 टक्के विद्यार्थी म्हणजे किमान 1 लाख युवक या उपक्रमात सहभागी होतील अशी अपेक्षाही त्यांनी या मुलाखतीत व्यक्त केली.

प्रत्येक महाविद्यालयातील सहभागीविद्यार्थ्यांमागे 1 मार्गदर्शक नेमणुक करण्यात येणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष मोबाईल ऍप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. या मोबाईल प्लीकेशनमध्ये प्रत्येक महाविद्यालयातील मार्गदर्शक, समन्वयक आणि सहभागीयुवक यांचे अकाऊंट असेल. त्याचबरोबर युवकांनीलाभार्थ्यानाद्यावयाची माहिती भरण्याची सोय यात देण्यात आलेली आहे.

 महाविद्यालयातील विद्यार्थी स्वत:या प्लीकेशनवर स्वत:च्या नावाची नोंदणी करू शकतात. युवकांनी लाभार्थ्यांना कोणत्या योजनांची माहिती द्यावी याकरीता तपशिल सांगणारा मजकूर/ व्हिडीओ/ एफएक्‍यू देण्यात आलेला असेल. त्याशिवाय योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्‍यक असणारी कागदपत्रे, अर्जाचे नमुने संबंधित शासकीय कार्यालयाचा संपर्क तपशिल माहिती दिलेली असेल. प्रस्तावित लाभार्थ्याची भेट घेतल्यानंतर “युवा माहिती दूत’ हे त्या लाभार्थ्यांचा तपशिल आपल्या मोबाईलमधील प्लीकेशनमध्ये नोंदवितील या तपशिलानुसार संबंधित योजनांची माहिती प्लीकेशनमधून घेऊन लाभार्थ्याना समजून सांगतील.लाभार्थ्यांना हे प्लीकेशन डाउनलोड करण्यासाठी माहिती दूत प्रेरित करतील. या प्लीकेशनला शासनाचे इतर प्लीकेशनदेखील जोडण्यात आले असल्याने सर्व योजना, उपक्रमांची माहिती लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी मिळणार आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि माहिती दूत यांमध्ये संदेशांची देवाणघेवाण, प्रशिक्षण, पुर्नविलोकन या प्लीकेशनमार्फत होईल. मार्गदर्शक, समन्वयक, माहिती दूत, प्रस्तावित लाभार्थी या सर्वांची नोंदणी मोबाईल क्रमांकाशी निगडीत असेल. विविध समाज घटकातील (शेतकरी, महिला, आदिवासी, अल्पसंख्यांक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती , ज्येष्ठ नागरिक आदी.) असलेल्या वैयक्तिक लाभाच्या किमान 40 योजना, सामुहिक विकासाच्या 5 योजना आणि स्थानिक पातळीवर महत्वाच्या 5 योजना अशा एकूण 50 योजनांचा समावेश या उपक्रमासाठी करण्यात आलेला आहे.

या उपक्रमाद्वारे युवा माहिती दूत म्हणून काम केल्यामुळे राज्यशासनाकरिता तळागाळाच्या पातळीवर काम करण्याची महत्वाची संधी युवकांना मिळणार आहे. युवा माहिती दूत अशी ओळख राज्यशासनाच्यावतीने त्यांना देण्यात येणार आहे.

ठरवून दिलेले काम केल्यानंतर त्यांना शासनाचे डिजिटल प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. किमान 1 लाख युवक राज्य शासनाच्या किमान 50 योजनांच्या माहितीशी जोडले जातील. या 1 लाख युवकांमार्फत किमान 50 लाख प्रस्तावित लाभार्थ्याशी म्हणजेच किमान 2 ते 2.50 कोटी व्यक्तींशी शासन जोडले जाईल. युवकांच्या समाजमाध्यमातील प्रभावी वापराचा शासकीय योजनांच्या प्रसारासाठी लाभ होईल, असा विश्वासही जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी या मुलाखतीत व्यक्त केला. ही मुलाख मंगळवार दि. 28 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 9. 30 आणि रात्री 9. 30 या वेळेत प्रसारित होणार आहे.