मेहनत करे मुर्गा, बैदा खाये फकीर


सातारा : भाजपने देशात काही जरी झाले तर ते आपल्यामुळेच झाले सांगण्याचा जो सांगण्याचा सपाटा सुरू केला आहे त्याकडे मेहनत करे मुर्गा और बैदा खाये फकीर म्हणून पहावे लागेल अशी टिका शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नरेंद्र पाटील यांनी केली.

जिहे-कठापूर योजनेवरून पाटील मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत योजनेसाठी भाजपकडून श्रेय घेण्याचा प्रयत्न करित असल्याच्या पार्श्‍वभूमीवर तोफ डागली. ते म्हणाले, जिल्ह्यात तर भाजप ही केरळा पार्टी झाली आहे. जिल्ह्यातील भाजपमध्ये मुळचे प्रमुख नेते दिसून येत नाहीत. दूसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांकडून जिल्ह्यात काही विकासात्मक कामे झाली तर ती आपल्या प्रयत्नातून दावा केला जात आहे. पंढरपूरची वारी जरी झाली तरी ती आपल्या प्रयत्नातून झाल्याचे सांगण्यात येते.

वास्तविक भाजप सरकार हे बाताडे सरकार आहे. सरकारकडून रोज 175 किलोमीटर रस्ते तयार केल्याचा दावा केला जात आहे परंतु दूसऱ्या बाजूला गेल्या चार वर्षात पुणे-सातारा महामार्गाचे 105 किलोमीटरचे काम त्यांना पुर्ण करता आले नाही. काश्‍मिरमध्ये हल्ले सुरूच आहेत, महिलांवर अत्याचार सुरूच आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना 46 कोटी रूपयांच्या बोफोर्स घोटाळ्याच्या आरोपावरून राजीनामा दिला होता.मात्र, आता राफेल विमान खरेदीत 36 हजार कोटी रूपयांच्या खरेदीवरून आरोप होत असताना सरकारच्यावतीने कोणी साधे उत्तर द्यायला तयार नाही. तसेच गेल्या 4 वर्षात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव मोदी व शहा यांनी घेतले नाही मात्र मृत्यूनंतर अंतयात्रेत 4 किलोमीटर चालत आहेत, त्याचा आता काय उपयोग असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.

राज्यात हिंदूत्वादी कार्यकर्त्यांना अटक केली जात असल्याबाबत त्यांनी तपासयंत्रणांवर शंका व्यक्त केली. तसेच लोकशाहीत प्रत्येकाला मोर्चे काढण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले. हिंदूत्वादाची व्याख्या करताना ते म्हणाले आपण प्रथम भारतीय, नंतर महाराष्ट्रीय व अखेर हिंदू आहोत. हिंदू धर्मात सहिष्णुता व बंधूभाव जोपासण्याची शिकवण दिली आहे असे सांगून पाटील यांनी शहरातील गणेश विसर्जनाच्या प्रश्‍नावर बोलताना ते म्हणाले, विसर्जनासाठी कृत्रिम तलाव दरवर्षी खोदून पैसे खाण्याचे काम पालिकेकडून होत आहे. त्यामुळे पारंपारिक तळ्यांमध्ये विसर्जन झाले पाहिजे. परंतु दूसऱ्या बाजूला प्रशासनाने गणेशोत्सव मंडळांना 3 फुट उंचीपर्यंत व रासयनिक रंग टाळून मुर्ती बसविल्या पाहिजेत. त्याच मुर्त्यांचे पांरपारिक विसर्जन तळ्यात व्हावे उर्वरित 3 फुटापेक्षा अधिक उंचीच्या मुर्तींचे विसर्जन करण्याची जबाबदारी मंडळांवर सोपविली पाहिजे.

No comments

Powered by Blogger.