रस्त्यावर हुल्लडबाज सतरा जणांना समज


सातारा : सातारा शहरात रात्री वाढदिवस साजरा करून हुल्लडबाजी करणाऱ्या युवकांवर पोलिसांनी कारवाई करून त्यांना समज दिली आहे.

शहरातील कमानी हौद परिसरात गुरूवारी मध्यरात्री रस्त्यावरच हुल्लडबाजी करणाऱ्या तेरा जणांवर कारवाई केली. दरम्यान पंताचा गोट परिसरात रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. कारवाई केल्यानंतर त्या हुल्लडबाजांना समज देऊन सोडण्यात आले. ही कारवाई सातारा शहरच्या पोलिस उपनिरीक्षक विजया वंजारी व त्यांच्या पथकाने केली.

No comments

Powered by Blogger.