जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोळपणीला जोर
जुनच्या शेवटच्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे आणि हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज दिल्याने बळीराजाने पेरण्या उरकून घेतल्या. पेरण्या पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांतच मान्सूनने जिल्ह्यात दमदाम हजेरी लावली. पावसामुुळे शिवारेही हिरवीगार झाली आहेत. पिके चांगली उगवून आली आहेत. तसेच पिकांसोबत शेतात मोठ्या प्रमाणात गवतही उगवले आहे. त्यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने उघडिप दिल्यामुळे गवत काढण्यासाठी शेतकऱ्याची लगबग सुरु झाली आहे. मजुरांचा तुटवडा तसेच मजुरीचा दर परवडणारा नसल्याने अनेक ठिकाणी शेतकरी कोळप्याच्या सहाय्यानेच हे गवत काढत आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात चांगल्या पावसामुळे पिके जोमात आहेत. मात्र, जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागात म्हणावा तितका पाऊस पडला नसल्यामुळे माण-खटावसह कोरेगाव आणि फलटण तालुक्यात चांगली उगवून आलेली पिके पावसाअभावी जळुन जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे याठिकाणचा शेतकरी वर्ग दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.
Post a Comment