मैत्रीतुन मिळालेली ‘लक्ष्मी’ अन् ‘प्रेरणा’


मित्र म्हणजे कोण? जो आपल्या सुखाचा आणि दुःखाचा धनी असतो. अगदी कमी वेळेत आपल्यासोबत राहून मैत्री घट्ट करतो. सगळेच तर मित्र आहेत मग जवळचा कोण? काही संबंध असे असतात जे कोणत्या पद आणि प्रतिष्ठेवर नाही तर स्नेह आणि विश्वासावर टिकून असतात.

अशीच एक मैत्री आहे त्यातून एकीला लक्ष्मी तर दुसरीला प्रेरणा मिळाली आहे.पोलिस मुख्यालयातील उपअधीक्षक (गृह) राजलक्ष्मी शिवणकर कोरेगावच्या पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या मैत्रीबद्दल वेगळे काही सांगण्याची गरज नाही. प्रेरणा कट्टे या प्रशिक्षण संपवुन सातार्‍यात आल्या तेव्हा शिवणकर या कराड उपविभागाला होत्या.

कट्टेंना कोरेगाव उपविभाग मिळाला होता. बंदोबस्त व मिटींगमध्ये झालेली ओळख आज त्यापुर्ती मर्यादीत नसुन या मैत्रीने एकीला लक्ष्मी तर दुरीला प्रेरणाच मिळाली आहे.

संकटात असताना पहिला मदतीचा हात मित्राचा असतो, डोळ्यातले अश्रू पुसायला येणारे हात मैत्रीचे असतात, पाठीवर शाबासकीचे तर कधी धीर देणारे पहिले हात मैत्रीचे असतात. मैत्रीची व्याख्या नसते, तिला व्यक्त करण्यासाठी कधी-कधी शब्दही अपुरे पडतात. काही दिवसापुर्वी कट्टे यांचा अपघात झाला.

त्यावेळी हॉस्पीटलमध्ये पहिल्यांदा पोहचल्या त्या राजलक्ष्मी शिवणकर. त्यानंतर त्यांनी कट्टे यांची घेतलेली काळजी पाहुन या सख्या बहिणी तर नाहीत ना? असा सवाल आजुबाजुचे लोक विचारायचे. हे सांगताना कट्टेंच्या डोळ्यात तरळलेले अश्रु त्यांच्या मैत्रीची विण किती घट्ट आहे ते सांगतात.

याबद्दल प्रेरणा कट्टे सांगतात कामाचा कितीही ताण असला तरी आम्ही दिवसातुन एकदा तरी फोनवरून संपर्क साधतो. त्याशिवाय आम्हाला करमतच नाही. कामाच्या ओळखीतुन झालेली मैत्री जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. मैत्री सोशल मीडियावर व्यक्त होऊन ज्ञात नाही करता येत तर ती प्रत्यक्ष अनुभवावी लागते. या मैत्रीचं स्वरुप खूप वेगळं आहे.

No comments

Powered by Blogger.