डंपरच्या चाकांवर चोरट्यांचा डल्ला


वाई : वाई-सुरुर रस्त्यावर असलेल्या टाटा मोटर्स गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी लावलेल्या डंपरच्या मागील बाजूंचे चारही टायर डिस्कसह चोरट्यांनी पळविल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

ब्राह्मणशाही (वाई) येथील नितीन जगताप यांचा डंपर दुरुस्तीसाठी आठ दिवसांपूर्वी टाटा मोटर्स गॅरेजमध्ये लावला होता. सोमवारी रात्री गॅरेज बंद असताना चोरट्यांनी जॅकच्या सहाय्याने डंपरच्या मागील बाजूचे चारही टायर आणि डिस्क चोरुन नेले. मंगळवारी सकाळी गॅरेजचे मालक नेहमीप्रमाणी गॅरेज उघडण्यासाठी आले असता चोरीची बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी त्वरीत डंपर मालक जगताप यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर नितीन जगताप यांनी वाई पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार शिवाजी वायदंडे करत आहेत.

No comments

Powered by Blogger.