आरटीओ कार्यालय परिसरात एजंटांची धराधरी


सातारा : माझ्याकडे असणारे पासिंगचे काम तू कमी पैशात का करतो? असे म्हणत मारहाण केल्याची तक्रार सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. दोन एजंटांमध्ये कामावरून झालेल्या मारहाणीमुळे आरटीओ कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी संतोष गुलाब शिंदे रा.पाटखळ यांनी तक्रार दिली आहे.

संतोष यांचे आरटीओ कार्यालय परिसरात मोटार ड्रायव्हिंग स्कूल आहे. ते शुक्रवारी नेहमीप्रमाणे काम करत असताना त्यांना गणेश शिवाजी पवार रा. करंजे व त्याच्या पाच साथीदारांनी मारहाण केली. गणेश हा पण आरटीओ कार्यालर परिसरात एंजट म्हणून काम करतो. त्याच्याकडे साताऱ्यातील एका शोरुमच्या गाड्या पासिंगचे काम होते. मात्र ते काम काही दिवसापुर्वी त्या शोरूमने संतोष यांना दिले. त्यामुळे चिडलेल्या गणेश याने तू माझे काम कमी पैशात करतो. तूला सोडणार नाही. तुझा डोळाच फोडतो असे म्हणत संतोष यांना मारहाण केली. या मारहाणीत संतोष यांच्या डोळ्याला जखम झाली आहे. जखमी संतोष यांच्यावर जिल्हा शासकयि रूग्णालयात उपचार सुरू होते.

उपचारानंतर संतोष गुलाब शिंदे यांनी गणेश शिवाजी पवार, विशाल (पुर्ण नाव माहित नाही) व त्यांचे चार अनोळखी साथीदार यांच्या विरोधात मारहाणीची तक्रार दिली आहे. या गुन्ह्याचा तपास पो.हवा. मच्छिंद्र जाधव करत आहेत.

No comments

Powered by Blogger.