उदयनराजेंच्या हाती डंपरचे स्टेअरिंग


सातारा : खासदार उदयनराजे कधी काय करतील हे सांगता येत नाही. त्यांची एंट्री ही नेहमीच हटके आणि धमाकेदार असते. याचा प्रत्यय सातारकरांना पुन्हा एकदा आला. आज त्यांनी चक्क त्यांनी सातारा नगरपालिकेचा डंपर चालवला.सातारा नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील गाड्यांचे पूजन आज करण्यात आले. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी पूजनांनंतर चक्क डंपरचे स्टेअरिंग हातात घेतले. त्यांनी पालिकेच्या वाहतूक विभागापासून राजवाडा चौपाटीपर्यंत डंपर चालवला. त्यांच्या या ककृतीने सगळेच अवाक झाले.

No comments

Powered by Blogger.