दहिवडीमध्ये कचऱ्याचे साम्राज्य
दहिवडी : दहिवडीमध्ये कचरा समस्येचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे. याबाबत नागरिकांनी नगरपंचायत कर्मचारी, अधिकारी यांच्याकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

दहिवडी बसस्थानक परिसरात गटारे कचऱ्याने भरली गेली तरी याकडे स्वच्छता कर्मचारी फिरकत नाहीत. कुचऱ्या कुंड्या भरून वाहत आहेत. त्याठिकाणी अस्वच्छता असल्याने नागरिक त्या ठिकाणी कचरा टाकत नाहीत. दुकानदार, व्यापारी कचरा रस्त्यावर टाकत आहेत. हा कचरा गटारांमध्ये जाऊन अडकून पडत आहे. नगरपंचायतने लाखो रुपये खर्च करूनदेखील गटारे आणि स्वच्छतेचा प्रश्न जैसे थे आहे. संबंधित विभागातील नगरसेवक याकडे पाहायलाही तयार नाहीत. पाण्याचे नळ कनेक्‍शन तसेच फुटलेल्या पाइपलाइन, गटारमध्येच वाहत आहेत. याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहे.

No comments

Powered by Blogger.