आरडगांव-गरवारे कंपनीच्या इम्प्लॉईज युनियनच्या अध्यक्षपदी संजय म्हस्के


वाई  : गरवारे वॉल रोप्स इम्प्लॉईज युनियन च्या झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत संजय रोहिदास म्हस्के यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. तर सेक्रेटरी पदी किरण निवृत्ती नायकवडी विजयी झाले आहेत.

नुकतीच युनियन ची निवडणूक पार पडली यामध्ये वाई विद्यमान अध्यक्ष महेंद्र धनवे यांच्या नेतृत्वाखाली श्रमिक विकास आघाडी तर संजय म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली कामगार विकास आघाडी यांच्यात अकरा जागांसाठी चुरशीची निवडणूक झाली. या निवडणुकीत म्हस्के यांचे कामगार विकास आघाडी पॅनेल मताधिक्याने विजयी झाले. नूतन विजयी सदस्यांची बैठक अध्यक्ष म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून यामध्ये नवीन कार्यकारणीची घोषणा करण्यात आली. 

ती पुढील प्रमाणे: अर्जुन विलास सावंत(उपाध्यक्ष), शंकर दौलतराव मांढरे(उपाध्यक्ष), विनोद कृष्णराव कदम(सह. जन. सेक्रेटरी), सचिन सुरेश मोरे(सह. जन. सेक्रेटरी), कांताराम देवराम लिंभोरे(खजिनदार), तर सदस्य पदी उदय यशवंत भिलारे, तानाजी यशवंत दोरगे, देवराम आप्पाजी वाघमोडे, तुळशीराम किसन थवरे, यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष म्हस्के म्हणाले, सर्व कामगारांसाठी अत्यंत चांगल्या प्रकारच्या सेवा सुविधा तसेच त्यांच्या सुरक्षिततेबाबत विशेष प्रयत्न करणार आहे. तसेच वेतनवाढिसाठी कंपनीकडे पाठपुरावा करणार आहे.

नूतन कार्यकारिणीचे आ. मकरंद पाटील, नगरसेवक संग्राम पवार, चरण गायकवाड, दीपक ओसवाल, भारत खामकर,प्रदीप चोरगे, मिलिंद पाटील, संजय लोळे, मनीष भंडारी, माजी नगरसेवक संदीप नायकवडी, हरीश यादव, पोपट नलावडे, आबा वाघ आदी. आजी माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

No comments

Powered by Blogger.