पाचगणीत कडीकडीत बंद


पाचगणी : मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यास राज्यशासनला होत असलेला विलंबाच्या निषेधार्थ सकल मराठा समाज एकवटला आहे. आरक्षणाच्या मुद्यावरुन मराठा समाजाने गुरुवार, 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंद पाचगणी व भिलार परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

भिलार (ता. महाबळेश्वर) येथे मराठा आरक्षण मिळावे म्हणून सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाच्याला पांचगणी व भिलार ग्रामस्थांनी संपूर्ण पाठिंबा दर्शवत संपूर्ण भिलार (पुस्तकाचे गाव), पांचगणी,भोसे, गुरेघर, परिसरातील दुकाने बंद ठेवून संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन आपला पाठींबा दिला.

आज सकाळपासूनच भिलारमध्ये सकल मराठा क्रांती मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पांचगणी पंचक्रोशीतील शेकडो कार्यकरते आज सकाळी पांचगणी येथे छ. शिवाजी चौकात जमा झाले. यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला. यावेळी पांचगणी संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवले. भिलरच्या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून आपला पाठिंबा दिला. यावेळी संपूर्ण तालुक्‍यात वाहतूक पूर्णपणे बंद होती एसटी स्टॅंड आज ओस पडली होती. यावेळी कोणतंही अनुसूचित प्रकार घडू नये. यासाठी पंचगणी सपोनि तृप्ती सोनवणे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

No comments

Powered by Blogger.