महामानवांच्या विचारधारेवरच राष्ट्राची जडण- घडण होऊ शकते : डॉ. सयाजीराजे मोकाशी


मायणी : मायणीप्रखर राष्ट्राभिमान रुजविणारे राष्ट्रीय नेते लोकमान्य टिळक व सर्वसामान्यांचे जगणे शब्दबद्ध करणारे लेखणीसम्राट आण्णा भाऊ साठे यांचा आदर्श युवकांनी घ्यावा. महामानवांच्या विचारधारेवरच राष्ट्राची जडण- घडण होऊ शकते असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी यांनी केले.

येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित लो. टिळक व साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी बी.ए. भाग -१ व बी.एस्सी. भाग-१ प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच प्रातिनिधीक स्वरुपात कु. ऋतूजा देवीदास देशमुख( बी.ए. १) व जयेश दिलीप पवार ( बी.एस्सी.१) या गुणवंत विद्यार्थांचा सत्कार करणेत आला. सदर वेळी प्रा.डी.जे. जाधव व संग्राम देशमुख यांनी मनोगते व्यक्त केली.

No comments

Powered by Blogger.