मरीआईचीवाडी येथे विकासकामांची उद्घाटने


लोणंद : खंडाळा तालुक्यातील मरीआईची वाडी येथे आमदार मकरंद आबा पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले.

मरीआईचीवाडी येथील स्वागत कमान, पाण्याची टाकी, पाईपलाईन, रस्ताची कामे इत्यादी विकास कामांचा शुभारंभ आमदारांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले, मरीआईची वाडी लहान गाव असले तरी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात अग्रेसर आहे. आमदार म्हणून आपण नेहमीच तिन्ही तालुक्यांना नेहमीच न्याय देऊन प्राधान्याने प्रश्न मार्गी लावलेले आहेत असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, निरा देवधरचे पाणी वाघोशी पर्यंत आणले आहे. रखडलेले चौपदरीकरन मार्गी लागले आहे. पालखी मार्गाचे कामही लवकरच सुरू होत आहे. औद्योगिकीकरणामुळे गावाच्या महसूलात वाढ होऊन गाव श्रीमंत म्हणून गणले जातेय. त्यामूळे एक दिलाने काम केल्यास गावाचा व त्यामूळे व्यक्तीवा नक्कीच विकास होईल.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस खंडाळा अध्यक्ष दत्तानाना ढगाळ, कृषी सभापती मनोज पवार, जिल्हा परिषद सदस्या दिपालीताई साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पंचायत समिती सदस्य राजेंद्र तांबे, पंचायत समिती सदस्या अश्विनी पवार, लोणंद बाजार समितीचे उपसभापती दत्तात्रय बिचुकले,खंडाळा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष उत्तमराव शिंदे, पाडेगावचे सरपंच हरिश्चद्र माने, उपसरपंच विजयराव धायगुडे व ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच जालिंदर रासकर यांनी स्वागत तर दादासाहेब रासकर यांनी आभार मानले.

No comments

Powered by Blogger.