Your Own Digital Platform

जुगार खेळणाऱ्यासह गुटखा विक्री करणारे ताब्यात


सातारा : सातारा शहरात सुरू असलेल्या विविध जुगार अडड्यांवर छापा टाकत एलसीबीने सहा जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान साताऱ्यात बंदी असलेला गुटखा विकणाऱ्या दोघांनाही ताब्यात घेऊन एलसीबीने दोन्ही कारवाईत 21 हजारांचा माल हस्तगत केला आहे.

याबाबत माहिती अशी की, सातारा शहरातील मोळाचा ओढा, गोडोली नाका, वाढे फाटा, शिवराज पंपासमोर, हॉटेल मनाली शेजारी मटका अड्डा सुरू असल्याची माहिती पो.नि. पद्माकर घनवट यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पो.उपनिरीक्षक शशिकांत मुसळे यांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.

मिळालेल्या सूचनेनुसार मुसळे यांनी छापे टाकले. कारवाईत जुगार अड्ड्यावर एकूण दहा लोकांवर कारवाई करून त्यांच्याकडुन 6 हजार रुपये किंमतीचे जुगार साहित्य जप्त केले. दरम्यान याच पथकाला कमानी हौद व खंडोबाचा माळ या परिसरात दोन युवक बंदी असलेला गुटखा विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत त्या युवकांच्याकडून 15 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला.

या दोन्ही कारवाईतील संशयीतांच्या विरोधात सातारा शहर व शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
या कारवाईत पो.नि. पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक शशिकांत मुसळे, पो.हवा. विजय शिर्के, दिपक मोरे,तानाजी माने,विजय कांबळे,शरद बेबले,प्रमोद सावंत यांनी सहभाग घेतला.