Your Own Digital Platform

सातारा नगरपरिषदेचा वर्धापन दिन विविध गुण दर्शनाने रंगला


सातारा : सातारा नगरपरिषद साताराचा 166 व्या वर्धापन दिन विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाने रंगला. शाहू कला मंदिरात नगर पालिका कर्मचाऱ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात नगराध्यक्ष माधवी कदम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली. यावेळी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, नगरसेवक निशांत पाटील,नियोजन समितीच्या सभापती स्नेहा नलावडे, नगरसेविका आशा पंडित, सविता फाळके, मुख्य अभियंता भाऊसाहेब पाटील, दत्ता बनकर, अशोक मोने, किशोर पंडित, बाळासाहेब बाबर, बाळासाहेब ढेकणे आदी उपस्थित होते.

जुन्या पिढीचा गायक किशोर कुमार, महंमद रफी, येसूदास, मन्ना डे यांच्यापासून ते नव्या पिढीच्या गळ्यातील ताईत असलेले कुमार सानू, सोनू निगम, अलका याज्ञीक यांची गाणी पालिका कर्मचारी, अधिकारी यांनी गायली. त्यांच्या गाण्यांना शिट्ट्या अन टाळ्यांनी सातारकरानी उत्स्फूर्तपणे दाद दिली. नृत्याला वन्स मोअर अशी ललकारी देऊन प्रतिसाद दिला गेला.

कार्यक्रम ची सुरुवात मनोज बिवाल यांच्या गीत गायनाने झाली. त्या नंतर ‘माना हो तुम बेहद्द हसी’ हे अप्रतिम गीत सोमनाथ कुलकर्णी यांनी सादर केले. स्नेहल माने यांच्या गोड आवाजातील गाण्यांना ही दाद मिळाली.दुर्वास कांबळे यांनी विविध गाणी गात वाहवाह मिळवली. त्यांच्या गीताला भारती गायकवाड यांनी 500 रुपये बक्षीस दिले.बाजीगर चित्रपटातील ‘छुपाना भी नही आता… हमे तुमसे मोहबत है बताना भी नही आता’ हे गीत बाबू शेलार यांनी सादर करत कार्यक्रमात रंगत आणली.संतोष खुडे यांनी किशोर कुमार यांची गाणी सादर केली.

 राजेश खन्ना यांच्या सफर चित्रपटातील ‘ जीवन से भरी तेरी आखे मजबूर करे जिने के लिये, हे किशोर कुमार यांच्या आवाजातील इकबाल शेख सादर केले. विजय खवळे यांनी “गोंधळ मांडीला उद’ हे नृत्य सादर केलं. तुकाराम गायकवाड ‘आपके आ जाने से’ हे गोविंदा याच्याप्रमाणे नृत्य केलं.’ं अनंत प्रभुणे, स्नेहल माने यांनी ही गाणी सादर केली. कार्यक्रमाची उंची वाढत गेली. टाळ्या अन शिट्याचा प्रतिसाद मिळत होता. रवी शेलार यांनी विनोदी सुत्रसंचलनाने हशा वसूल केला.