काटवलीतील युवकांनी दिले मोराला जीवनदान


भिलार : काटवली ता.जावली येथील ग्रामस्थांनी राष्ट्रीय पक्षी असणार्‍या जखमी मोराला औषधोपचार करून जीवदान दिले. ग्रामस्थांनी वन्य पक्ष्यांबाबत दाखवलेले औदार्य व आपुलकी पाहून परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. काटवली येथील दीपक बेलोशे यांच्या शेतात एक जखमी मोर पडला असल्याचे काही लोकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्परतेने जावली व महाबळेश्‍वर वन विभागाशी संपर्क साधून अधिकार्‍यांना माहिती दिली. तोपर्यंत सरपंच हणमंत बेलोशे, तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर बेलोशे धनराज वट्टे, तेजस बेलोशे, अभिषेक बेलोशे, ओंकार पोरे यांनी व ग्रामस्थांनी जखमी मोराला काटवली येथील दवाखान्यात आणले.

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गोळे यांनी मोरावर प्राथमिक उपचार करुन अधिक उपचारासाठी मेढा येथे पाठवले. यावेळी हुमगावचे वनरक्षक आर.ऐ. परधाने व मेढ्याचे वनपाल रज्जाक सय्यद यांनी जखमी मोरास ताब्यात घेवून उपचारासाठी नेले. काटवली व परिसरात मोर व लांडोरांच्या संख्येत वाढ झाली आहे.त्यांचा शेतीत उपद्रवही वाढला आहे. असे असले तरी माणुसकीच्या भावनेने या जखमी मोराला ग्रामस्थांनी जीवदान देण्याचा केलेला प्रयत्न इतरांना प्रेरणादायी असल्याचे बोलले जात आहे.

No comments

Powered by Blogger.