Your Own Digital Platform

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत विवेकानंद ऍकॅडमी विजेता


पुसेगाव : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्यातर्फे रहिमतपूर येथे नुकत्याच झालेल्या एकोणीस वर्षाखालील कोरेगाव तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत चिमणगाव येथील विवेकानंद ऍकॅडमी ऑफ ह्युमन एक्‍सलन्स (सीबीएसई) या शाळेच्या क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात रहिमतपूर येथील आदर्श विद्यालयावर मात करुन विजेतेपद पटकावले.

या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असल्याचे या शाळेच्या प्राचार्या रुपाली शहा यांनी सांगितले. या संघातील प्रशांत सावंत, शिवम पवार, सागर राय, अभय कुमकुले, शुभंकर गुजर, आदित्य भोसले, आयुष कोकीळ, अनिकेत जाधव, जैदराज नदाफ, निखील तांबे, ओंकार गुजर यांनी या स्पर्धेत चमकदार खेळ करुन संघाला विजेतेपद मिळवून दिले. क्रीडा शिक्षक सुरेश खराडे यांनी या संघाला मार्गदर्शन केले. विजेत्या संघातील खेळाडूंचा प्राचार्या रुपाली शहा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.